#श्रीक्षेत्र #कुरवपूर प्रवास

#श्रीक्षेत्र #कुरवपूर प्रवास फोटो साभार - केदारजी पुजारी, अक्कलकोट गेल्या काहो दिवसांपासून श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी असलेल्या श्रीक्षेत्र कुरवपूर येथे जाण्याबाबत विचार चालू होता. तसे संकेत ही मिळत होते. आणि योग आज आला. काल मित्र अवधूत तोळबंदे याने विचारले की कुरवपूर ला जायचं का? हो नाही म्हणत जायचे नक्की झाले. मी, दीपक कुलकर्णी आणि अवधूत आम्ही तिघे संध्याकाळी बसव एक्स्प्रेस ने निघालो. आणि थेट कर्नाटकातील जिल्हा केंद्र रायचूर गाठले. लॉजवर थांबण्याबाबत दीपक आग्रही होता कारण मागच्या वेळी जेंव्हा दीपक आणि अवधूत आलेले तेंव्हा स्टेशनवर थंडीचा त्रास अधिक सहन करावे लागले होते म्हणून. यावेळी ही लॉज वर किंवा स्टेशनवर न थांबत रायचूर शहरातून चालत आम्ही बस स्थानक मध्ये गेलो. तिथे रात्री ३ ते ५ साधारण २ तास झोपून उठल्यावर आम्ही इडलीचा गाडा शोधायला बाहेर पडलो कारण भूकच तेवढी लागलेली. बस स्थानक च्या बाहेरच एका गाड्यावर गरमागरम मेदू वडे तळतानाचे आणि इडलीचे कुकर दिसले तसे आमचा मोर्चा तिकडे वळला आणि अप्रतिम झालेल्या इडलीवर ताव मारून ०७:०० वाजता येणाऱ्या अतकुर / कुरवपूर च्या बस ...