"विजय सुनिश्चित होती उनकी श्रम जिनका अविराम है...!"
नमस्कार, कोजागिरीच्या निमित्ताने आपण सारे संगमेश्वर महाविद्यालयात एकत्र आलो होतो. या एकत्रीकरणात पूर्व कार्यकर्ता म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मी भूतकाळात हरवलो. कार्यक्रम सुरु असताना मला साधारण 9 -10 वर्षापूर्वी अभाविप द्वारेच केलेली कोजागिरी आठवली. 10 वर्षापुर्वी शिवस्मारक येथे झालेल्या आणि आताच्या कार्यक्रमातील स्वरूप साधारण एक सारखेच होते. अश्या छोट्या कार्यक्रमामधुनच मी कार्यकर्ता म्हणून घडलो. अर्थात घडलो हे म्हणणे म्हणजे थोडेसे धाडसाचे ठरेल. याच काळात कार्यपद्धती शिकलो आणि संघटन शरण झाला. या लेखन प्रपंचाला अजुन एक कारण आहे. या कोजागिरीला विद्यापीठ विकास मंच द्वारे लढवलेल्या विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या विजयाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे या कार्यक्रमात अनेकांनी निवडणुकीतील आपले अनुभव सांगितले. पूर्व कार्यकर्ते, विजयी उमेदवार, प्राध्यापक कार्यकर्ते यांच्या अनुभवातून हे जाणवलं की हा विजय वर्तमान कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. हे अनुभव कथन म्हणजे अभाविपच्या कार्यपद्धतीच्या जिवंतपणाचे उदाहरण आहे. वाढत्या सोशल मिडियाच्या प्रभावामुळे कार्यकर्ता प्...