"विजय सुनिश्चित होती उनकी श्रम जिनका अविराम है...!"

नमस्कार,
कोजागिरीच्या निमित्ताने आपण सारे संगमेश्वर महाविद्यालयात एकत्र आलो होतो. या एकत्रीकरणात पूर्व कार्यकर्ता म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मी भूतकाळात हरवलो. कार्यक्रम सुरु असताना मला साधारण 9 -10 वर्षापूर्वी अभाविप द्वारेच केलेली कोजागिरी आठवली.  10 वर्षापुर्वी शिवस्मारक येथे झालेल्या आणि आताच्या कार्यक्रमातील स्वरूप साधारण एक सारखेच होते. अश्या छोट्या कार्यक्रमामधुनच मी कार्यकर्ता म्हणून घडलो. अर्थात घडलो हे म्हणणे म्हणजे थोडेसे धाडसाचे ठरेल. याच काळात कार्यपद्धती  शिकलो आणि संघटन शरण झाला.

या लेखन प्रपंचाला अजुन एक कारण आहे. या कोजागिरीला विद्यापीठ विकास मंच द्वारे लढवलेल्या विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या विजयाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे या कार्यक्रमात अनेकांनी निवडणुकीतील आपले अनुभव सांगितले. पूर्व कार्यकर्ते, विजयी उमेदवार, प्राध्यापक कार्यकर्ते यांच्या अनुभवातून हे जाणवलं की हा विजय वर्तमान कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. हे अनुभव कथन म्हणजे अभाविपच्या कार्यपद्धतीच्या जिवंतपणाचे उदाहरण आहे.

वाढत्या सोशल मिडियाच्या प्रभावामुळे कार्यकर्ता प्रत्यक्ष संपर्क न करता भ्रमणध्वनी, #Whatsapp, #Facebook वरच व्यस्त असतो अशी तक्रार आपण सतत करत असतो. मात्र अभाविपची कार्यपद्धती ही कालसुसंगत आहे त्यामुळे सोशल मिडिया सोबतच, कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संपर्क केल्याचे देखील मी पाहिले आहे. प्रत्येक कामाला कार्यकर्ता आणि प्रत्येक कार्यकर्त्याला काम हे सूत्र या निवडणुकीत व्यवस्थित राबविल्यामुळे ही निवडणूक जिंकणे सहज शक्य झाले. सोलापूर महानगर मंत्री Priyanka Patil हीच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांमध्ये कामाची विभागणी करुन सकाळ संध्याकाळ संपर्क आणि कार्यालयातून Akshay Kulkarni, Om Kulkarni व अन्य कार्यकर्ते मिडिया, सोशल मिडिया चालवत होते. विद्यापीठ अधिसभेच्या तयारीत मी पहिल्या दिवसापासून सहभागी होतो. तेंव्हा पासून वर्तमान कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या सातत्यपूर्ण कामाचा परिपाक म्हणजे सोलापूर विद्यापीठ अधिसभेत पदवीधर मधून विजय संपादित केलेले ५ सभासद. नाव नोंदणीसाठी केलेला प्रवास व संपर्क, नाव नोंदणीची मुदत वाढावी यासाठी केलेले उग्र आंदोलन, 2007 पूर्वीच्या शिवाजी विद्यापीठातील पदवीधरांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी कुलगुरु, शिक्षण मंत्री, राज्यपाल यांच्या पुढे धरलेला आग्रह किंवा कोर्टात जाण्याचा निर्णय असो, हे सगळ कार्यकर्ते सहज करत गेले ते आपल्या कार्यपद्धतीमुळेच. पदवीधर आणि त्या नंतर मतदार नोंदणी पूर्ण झाल्यावर शांत न बसता पायाला भिंगरी लावून वर्तमान कार्यकर्ते फिरत राहिले. मतदारांना संपर्क करत राहिले. जितकी नोंदणी झाली त्याच्या 75 टक्के मतदार मतदानाला उतरवणारच असा चंगच कार्यकर्त्यांनी बांधलेला होता. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर 2 ते 3 दिवसांच काम 9 तासात करण्याचा पराक्रम कार्यकर्त्यांनी केला.

सकाळी 7 वाजल्यापासून बूथवर कार्यकर्ते हजर होते. सकाळी 9 वाजता मतदानास सुरुवात झाली आणि संध्याकाळी 4 पर्यंत ती अखंडपणे चालू राहिली ती फक्त आणि फक्त अभाविपच्या कार्यकर्त्यांमुळे. वस्ती, कॉलनी, चाळ, शाळा, महाविद्यालय, जॉबची अनेक ठिकाण, यत्र तत्र सर्वत्र जाउन पदवीधर मतदारांना मतदान करण्यास या पदवीच शिक्षण ही पूर्ण न झालेल्या कार्यकर्त्यांनी भाग पाडल. मतदान कसे करावे, मतदान करताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन हे कार्यकर्ते करत होते. विरोधकही या कामाचे कौतुक करत होते तसेच भरभरून बोलत होते. झाले असे की, संगमेश्वर महाविद्यालयात दिवस भर मतदानाची धामधूम सुरु होती यावेळी अभाविपचे कार्यकर्ते जे दिसायला लहान होते ते कामात मात्र सर्वात पुढे होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एजाज शेख (विजयी सदस्य) यांचे एक नातेवाईक जे निवडणुकीत सक्रीय होते त्यांनी अभाविपची कार्यकर्ती Sonali Deshpande च्या कामातील सक्रियतेबद्दल कौतुक केल. ते म्हणाले भले आपण वेगळ्या विचारांचे पाइक आहोत मात्र तुमचे काम हे वाखाणण्यासारखे आहे आणि तेही एका विद्यार्थिनी कडून. हे वाक्य ऐकता क्षणी स्त्री स्वातंत्र्याच्या निव्वळ गप्पा मारणारे सारे अभाविपच्या या कार्यपद्धती समोर पराभूत ठरतात.

या निवडणुकीत अनेक जुन्या नव्या वर्तमान कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. Apurva Sarolkar ही कार्यकर्ती म्हणजे "काम बोलता है काम दिखता है" जास्त न बोलणारी ही कार्यकर्ती, संघटनेने मतदारांना फोन करण्याचे काम दिले आणि न थकता फोन करुन मतदानाचे निरोप देत होती. Smarth Bande, Yatiraj Honmane सारखे कार्यकर्ते मत मोजणीच्या वेळी दुष्ट प्रवृत्तिकडून आलेल्या संकटाना खंबीरपणे सामोरे जाताना मी पाहिले आहे. बार्शी मध्ये ही असेच अनुभव आले, नोंदणीच्या शेवटच्या दिवसीच्या अधल्या रात्री भगवंताच्या मंदिरात बसून कार्यकर्ते अर्ज भरत होते. आणि तेंव्हाच मी Ajay Argade, Ghavate सर यांना म्हणालेलो की आपली ही मेहनत आपल्याला नक्कीच यशस्वी बनवणार. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात असेच अनुभव असणार आणि असे अनेक अनुभव मी या निवडणुकीत अनुभवले आहेत. या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे असणारे प्राध्यापक आणि पूर्व कार्यकर्ते, विभाग संघटनमंत्री विलास बोरसे, स्वप्नील बिगड़े असे विजयाचे शिल्पकार अनेक आहेत त्या सर्वांच्या मेहनतीला प्रणाम.
"विजय सुनिश्चित होती उनकी श्रम जिनका अविराम है...!"

बोलण्यासारखे आणि लिहण्यासारखे खुप आहे. पुन्हा कधी तरी लिहीन...
✍🏻 चन्नवीर बंकुर, सोलापूर

Comments

Popular posts from this blog

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे'

#श्रीक्षेत्र #कुरवपूर प्रवास

शक्ती आणि भक्ती चे प्रतिक : आजोबा गणपती