मी लालपरी
मी लालपरी ✍🏻 - चन्नवीर बंकुर, सोलापूर 8983040108 लालपरी.... कुणा अनामीकाने मला हे नाव दिलं. अतिशय सुंदर, मला खु......प आवडलं, शहारून गेले हे नाव ऐकून लालपरी. रोज पहाटे गाव जागं व्हायच्या आधी मी अनेक गावांत जाते गावातील माझ्या आप्तांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवायला. होय माझे आप्तच. रोज माझ्या सोबत प्रवास करताना त्यांचे अनेक सुखदुःख ते मला सांगतात. मुलगा मोठा झाला... सुनबाई खूप छान आहे... नातू जन्मला... भावकितील वादामुळे पोलीस प्रकरण... हाणामारी... आजारपणं... गावातील जत्रा... पाऊस छान झाला... पेरणी... असे एक ना अनेक हितगुज माझ्यासोबत करणारे माझे आप्तच असणार ना? आज हे सगळं तुम्हाला सांगण्यास कारण मी आज एकटी पडली आहे. आज माझा चालक आणि वाहक दादा आलेच नाही. आज मी डेपो मध्ये एकटीच आहे. मला एकटेपण सहन होत नाही. रोज अनेक मित्र मैत्रिणी नातेवाईकांना भेटणारी मी आज एकटीच. का असे झाले यात माझी काय चूक? माझा काय दोष? मी एकटी असले तरी मला काळजी वाटते त्या आजीची,... तिच्या पायाला जखम आहे आणि साखरेचा आजार असल्यामुळे तिला रोज तालुक्याला यावं लागतं डॉक्टर कडे दाखवायला. आज ती माझी ...