Posts

Showing posts from May, 2020

कोरोना योद्धा शीतल

Image
शीतल नेहमी प्रमाणे लवकरच उठली. नेहमी प्रसन्न आणि नावाप्रमाणेच शीतल असणाऱ्या शीतलला अलीकडे वातावरणातील बदल अस्वस्थ करत. आज ही सकाळी तिला असेच जाणवले. सकाळी लवकर उठून सडा सम्मार्जन, देवपूजा, स्वयंपाक उरकून घरातून बाहेर पडायला 7 - 7:15 वाजलेच 7:30 ची बस पकडायची घाई होतीच. ती चुकली तर दिवसाच गणित चुकलंच समजायचं. शीतल मुंबई मधल्या एक संस्थेत काम करते. मुंबई म्हणले की धावपळ पाचवीला पुजलेलेच. रात्री उशिरा झोपणे, पहाटे लवकर उठणे आणि धावत पळत लोकल पकडणे हे मुंबईतील माणसे महाभारतातील अभिमन्यू प्रमाणे पोटात असतानाच शिकून येतात. शीतल ही त्यातलीच. पण गेले काही दिवस मुंबईतील हवा अधिकच दुषीत झाली आहे. कोरोना आणि टाळेबंद (लॉकडाऊन) मुळे जनजीवन ठप्प असल्याने प्रदूषण तर कमी झालं, मात्र कोरोनाने मुंबईत जे चित्र निर्माण झाले ते प्रचंड निराशपूर्ण भीतीदायक आहे. शीतल सरकारी कामातच असल्याने तिला कोरोनाच्या बाबती माहिती लवकर मिळते. आज थोडी धावपळ झाली पण बस मिळाली. शीतल आवरत असताना भार्गव बाईक तयार ठेवूनच असायचा. शीतल पळत पळत आली, की लगेच भार्गव बसस्टॉपकडे घेऊन जायचा. आज ही भार्गव मुळेच बस मिळाली. लोकल सुरू असले...