Posts

Showing posts from 2016

शक्ती आणि भक्ती चे प्रतिक : आजोबा गणपती

Image
सोलापूरचा इतिहास पहायचा ठरवले तर आजोबा गणपतीशिवाय पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रच नाही तर सार्‍या जगात, आज सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करणार्‍या लो .                             आजोबा गणपती कमान्य टिळकांना ही कल्पना सुचली ती त्यांच्या सोलापुरातील प्रवासात. घटना अशी आहे की, भारत स्वातंत्र्याची लढाई संपुर्ण देशात जोरात सुरु असताना स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळक 1885 साली सोलापुरात आले होते. सोलापुरातील त्यांचे मित्र अप्पासाहेब वारद यांच्या  ‘इंद्रभवन’मध्ये  (साध्य महानगरपालिकेची इमारत) ते नेहमी उतरत असत. अप्पासाहेबांसोबत शुक्रवार पेठेतील पानसुपारीच्या आणि गणेश उत्सवास येणार्‍या लोकांची संख्या पाहून टिळकांना हे उत्सव सर्वत्र साजरे करण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली आणी 1893 साली त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवली स्वातंत्रसैनिकांची खाण भारताच्या स्वातंत्रलढयाच्या इतिहासात सोलापूरला विशेषस्थान आहे....

मुंबई जीवाची मुंबई

मुंबई जीवाची मुंबई अभाविपच्या कामानिमित्त ABVP Maharashtra प्रदेश कार्यालय मंत्री म्हणून दोन वर्षापूर्वी या शहरात आलो. प्रचंड गर्दी.. दगदग... घाम या सार्याचाच मला पूर्वी पासून राग..... म्हणून मुंबई पण न आवडणार शहर. पणमाझा अनुभव असा आहे की न आवडणारी गोष्ट हि ‪#‎ABVP‬ च्या कामामुळे आवडायला लागते मुंबई बाबतीत ही तसेच झाले. आत्ता मुंबई माझी आहे. मुंबईत काम करत असाना आलेले सारे अनुभव चांगले आहेत शिकवणारे आहेत. आज या भारताच्या आर्थिक , अभाविपच्या कार्याच्या राजधानीला सोडून जातो आहे. न आवडणाऱ्या मुंबईवर प्रेम झाल आहे. यशवंतरावांची बाळासाहेबांची सुरेशरावांची मुंबई .... नवनवीन आयामांच्या कार्याच्या विविध पैलूंची जननी असणारी मुंबई. अनेककार्यकर्त्यान सोबत काम करायला खूप शिकायला मिळाल. या सर्वांची खूप आठवण येईल. नवीन जबाबदारी - ABVP Maharashtra सामाजिक सर्वेक्षण प्रदेश समन्वयक, नवीन शहर - ABVP Pune नवीन प्रदेश नवी उमेद त्याच कार्यपद्धतीने त्याच सैद्धांतिक भूमिकेच्या जोरावर नवी झेप आपल्या कार्याची.