उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे'
'उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे' –चन्नवीर बंकूर, प्रदेश कार्यालय मंत्री, अभाविप १४ एप्रिल १८९१ शतकानु-शतके अंधारात असणाऱ्या अनेकांचा सूर्योदय झाला, तो हा सुवर्ण दिवस भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाचा जन्मदिवस. हजारो वर्षांपासून नरक यातना भोगणाऱ्या, खचलेल्या-पिचलेल्या, शिक्षण आणि समाज प्रवाहापासून हजारो मैल दूर असणाऱ्या, समाज बांधवांना आत्मविश्वासाने उभा करणारा युग पुरुष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. शाहीर वामन दादा कर्डक यांनी त्यांच्या शाहीरीत “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे” हे बाबासाहेबांचे वर्णन तंतोतंत केले आहे. सुजलाम सुफलाम असणाऱ्या भारत या सोने कि चिडियावर, जगातील कित्येक लोक भाळले. भारतावर राज्य करण्याचे अनेकांनी स्वप्न पहिले, हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आणि सोन्याच्या चीडीयाचे पंख छाटले गेले नालंदा आणि तक्षशीला सारखी जगतविख्यात विद्यापीठे , उत्तमोत्तम आरोग्य सुविधा आणि ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतुः निरामया’ हा भाव घेऊन जगणारी प्रजा यामुळे हा देश सुजलाम सुफलाम होता. काळाच्...
Comments
Post a Comment