Posts

कोरोना योद्धा शीतल

Image
शीतल नेहमी प्रमाणे लवकरच उठली. नेहमी प्रसन्न आणि नावाप्रमाणेच शीतल असणाऱ्या शीतलला अलीकडे वातावरणातील बदल अस्वस्थ करत. आज ही सकाळी तिला असेच जाणवले. सकाळी लवकर उठून सडा सम्मार्जन, देवपूजा, स्वयंपाक उरकून घरातून बाहेर पडायला 7 - 7:15 वाजलेच 7:30 ची बस पकडायची घाई होतीच. ती चुकली तर दिवसाच गणित चुकलंच समजायचं. शीतल मुंबई मधल्या एक संस्थेत काम करते. मुंबई म्हणले की धावपळ पाचवीला पुजलेलेच. रात्री उशिरा झोपणे, पहाटे लवकर उठणे आणि धावत पळत लोकल पकडणे हे मुंबईतील माणसे महाभारतातील अभिमन्यू प्रमाणे पोटात असतानाच शिकून येतात. शीतल ही त्यातलीच. पण गेले काही दिवस मुंबईतील हवा अधिकच दुषीत झाली आहे. कोरोना आणि टाळेबंद (लॉकडाऊन) मुळे जनजीवन ठप्प असल्याने प्रदूषण तर कमी झालं, मात्र कोरोनाने मुंबईत जे चित्र निर्माण झाले ते प्रचंड निराशपूर्ण भीतीदायक आहे. शीतल सरकारी कामातच असल्याने तिला कोरोनाच्या बाबती माहिती लवकर मिळते. आज थोडी धावपळ झाली पण बस मिळाली. शीतल आवरत असताना भार्गव बाईक तयार ठेवूनच असायचा. शीतल पळत पळत आली, की लगेच भार्गव बसस्टॉपकडे घेऊन जायचा. आज ही भार्गव मुळेच बस मिळाली. लोकल सुरू असले...

#श्रीक्षेत्र #कुरवपूर प्रवास

Image
#श्रीक्षेत्र #कुरवपूर प्रवास फोटो साभार - केदारजी पुजारी, अक्कलकोट गेल्या काहो दिवसांपासून श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी असलेल्या श्रीक्षेत्र कुरवपूर येथे जाण्याबाबत विचार चालू होता. तसे संकेत ही मिळत होते. आणि योग आज आला. काल मित्र अवधूत तोळबंदे याने विचारले की कुरवपूर ला जायचं का? हो नाही म्हणत जायचे नक्की झाले. मी, दीपक कुलकर्णी आणि अवधूत आम्ही तिघे संध्याकाळी बसव एक्स्प्रेस ने निघालो. आणि थेट कर्नाटकातील जिल्हा केंद्र रायचूर गाठले. लॉजवर थांबण्याबाबत दीपक आग्रही होता कारण मागच्या वेळी जेंव्हा दीपक आणि अवधूत आलेले तेंव्हा स्टेशनवर थंडीचा त्रास अधिक सहन करावे लागले होते म्हणून. यावेळी ही लॉज वर किंवा स्टेशनवर न थांबत रायचूर शहरातून चालत आम्ही बस स्थानक मध्ये गेलो. तिथे रात्री ३ ते ५ साधारण २ तास झोपून उठल्यावर आम्ही इडलीचा गाडा शोधायला बाहेर पडलो कारण भूकच तेवढी लागलेली. बस स्थानक च्या बाहेरच एका गाड्यावर गरमागरम मेदू वडे तळतानाचे आणि इडलीचे कुकर दिसले तसे आमचा मोर्चा तिकडे वळला आणि अप्रतिम झालेल्या इडलीवर ताव मारून ०७:०० वाजता येणाऱ्या अतकुर / कुरवपूर च्या बस ...

मी लालपरी

मी लालपरी ✍🏻 - चन्नवीर बंकुर, सोलापूर 8983040108 लालपरी.... कुणा अनामीकाने मला हे नाव दिलं. अतिशय सुंदर, मला खु......प आवडलं, शहारून गेले हे नाव ऐकून लालपरी. रोज पहाटे गाव जागं व्हायच्या आधी मी अनेक गावांत जाते गावातील माझ्या आप्तांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवायला. होय माझे आप्तच. रोज माझ्या सोबत प्रवास करताना त्यांचे अनेक सुखदुःख ते मला सांगतात. मुलगा मोठा झाला... सुनबाई खूप छान आहे... नातू जन्मला... भावकितील वादामुळे पोलीस प्रकरण... हाणामारी... आजारपणं... गावातील जत्रा... पाऊस छान झाला... पेरणी... असे एक ना अनेक हितगुज माझ्यासोबत करणारे माझे आप्तच असणार ना? आज हे सगळं तुम्हाला सांगण्यास कारण मी आज एकटी पडली आहे. आज माझा चालक आणि वाहक दादा आलेच नाही. आज मी डेपो मध्ये एकटीच आहे. मला एकटेपण सहन होत नाही. रोज अनेक मित्र मैत्रिणी नातेवाईकांना भेटणारी मी आज एकटीच. का असे झाले यात माझी काय चूक? माझा काय दोष? मी एकटी असले तरी मला काळजी वाटते त्या आजीची,... तिच्या पायाला जखम आहे आणि साखरेचा आजार असल्यामुळे तिला रोज तालुक्याला यावं लागतं डॉक्टर कडे दाखवायला. आज ती माझी ...

"विजय सुनिश्चित होती उनकी श्रम जिनका अविराम है...!"

नमस्कार, कोजागिरीच्या निमित्ताने आपण सारे संगमेश्वर महाविद्यालयात एकत्र आलो होतो. या एकत्रीकरणात पूर्व कार्यकर्ता म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मी भूतकाळात हरवलो. कार्यक्रम सुरु असताना मला साधारण 9 -10 वर्षापूर्वी अभाविप द्वारेच केलेली कोजागिरी आठवली.  10 वर्षापुर्वी शिवस्मारक येथे झालेल्या आणि आताच्या कार्यक्रमातील स्वरूप साधारण एक सारखेच होते. अश्या छोट्या कार्यक्रमामधुनच मी कार्यकर्ता म्हणून घडलो. अर्थात घडलो हे म्हणणे म्हणजे थोडेसे धाडसाचे ठरेल. याच काळात कार्यपद्धती  शिकलो आणि संघटन शरण झाला. या लेखन प्रपंचाला अजुन एक कारण आहे. या कोजागिरीला विद्यापीठ विकास मंच द्वारे लढवलेल्या विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या विजयाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे या कार्यक्रमात अनेकांनी निवडणुकीतील आपले अनुभव सांगितले. पूर्व कार्यकर्ते, विजयी उमेदवार, प्राध्यापक कार्यकर्ते यांच्या अनुभवातून हे जाणवलं की हा विजय वर्तमान कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. हे अनुभव कथन म्हणजे अभाविपच्या कार्यपद्धतीच्या जिवंतपणाचे उदाहरण आहे. वाढत्या सोशल मिडियाच्या प्रभावामुळे कार्यकर्ता प्...

शक्ती आणि भक्ती चे प्रतिक : आजोबा गणपती

Image
सोलापूरचा इतिहास पहायचा ठरवले तर आजोबा गणपतीशिवाय पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रच नाही तर सार्‍या जगात, आज सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करणार्‍या लो .                             आजोबा गणपती कमान्य टिळकांना ही कल्पना सुचली ती त्यांच्या सोलापुरातील प्रवासात. घटना अशी आहे की, भारत स्वातंत्र्याची लढाई संपुर्ण देशात जोरात सुरु असताना स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळक 1885 साली सोलापुरात आले होते. सोलापुरातील त्यांचे मित्र अप्पासाहेब वारद यांच्या  ‘इंद्रभवन’मध्ये  (साध्य महानगरपालिकेची इमारत) ते नेहमी उतरत असत. अप्पासाहेबांसोबत शुक्रवार पेठेतील पानसुपारीच्या आणि गणेश उत्सवास येणार्‍या लोकांची संख्या पाहून टिळकांना हे उत्सव सर्वत्र साजरे करण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली आणी 1893 साली त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवली स्वातंत्रसैनिकांची खाण भारताच्या स्वातंत्रलढयाच्या इतिहासात सोलापूरला विशेषस्थान आहे....

मुंबई जीवाची मुंबई

मुंबई जीवाची मुंबई अभाविपच्या कामानिमित्त ABVP Maharashtra प्रदेश कार्यालय मंत्री म्हणून दोन वर्षापूर्वी या शहरात आलो. प्रचंड गर्दी.. दगदग... घाम या सार्याचाच मला पूर्वी पासून राग..... म्हणून मुंबई पण न आवडणार शहर. पणमाझा अनुभव असा आहे की न आवडणारी गोष्ट हि ‪#‎ABVP‬ च्या कामामुळे आवडायला लागते मुंबई बाबतीत ही तसेच झाले. आत्ता मुंबई माझी आहे. मुंबईत काम करत असाना आलेले सारे अनुभव चांगले आहेत शिकवणारे आहेत. आज या भारताच्या आर्थिक , अभाविपच्या कार्याच्या राजधानीला सोडून जातो आहे. न आवडणाऱ्या मुंबईवर प्रेम झाल आहे. यशवंतरावांची बाळासाहेबांची सुरेशरावांची मुंबई .... नवनवीन आयामांच्या कार्याच्या विविध पैलूंची जननी असणारी मुंबई. अनेककार्यकर्त्यान सोबत काम करायला खूप शिकायला मिळाल. या सर्वांची खूप आठवण येईल. नवीन जबाबदारी - ABVP Maharashtra सामाजिक सर्वेक्षण प्रदेश समन्वयक, नवीन शहर - ABVP Pune नवीन प्रदेश नवी उमेद त्याच कार्यपद्धतीने त्याच सैद्धांतिक भूमिकेच्या जोरावर नवी झेप आपल्या कार्याची.

Ha Chhatra Shakticha Jai : ABVP Maharashtra Theme Song

Image